पिक गाडी पलटी,रस्त्यावर आंब्याचा सडा;चालक जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 मे 2021,रविवार
संगमनेर तालुक्यातील घटना
केशर आंबे घेवून जाणारी मालवाहू पिकअप संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात पलटी झाला. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे महामार्गावर आंब्याचा सडा पडला होता तर चालक हा जखमी झाला.
मालवाहू पिकअप चालक मनोज गोविंद साठे हे गुजरात येथून पिकअपमध्ये अंदाजे शंभर कॅरेट केशर आंबे घेवून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने पुणे येथे जात होते. हा पिकअप माहुली घाटात पलटी झाला. त्यामुळे पिकअपमधील आंबे मोठ्याप्रमाणात महामार्गावर पडले होते. आंब्याचे नुकसान झाले. कॅरेटही तुटले होते.
डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील कर्मचारी नारायण ढोकरे, भरत गांजवे, विशाल कर्पै यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिवरगावा पावसा टोलनाक्याचे क्रेन बोलवण्यात आले होते. दरम्यान पिकअप चालक मनोज साठे उजव्या हाताला मोठी जखम झाली होती.