शेवगाव - महीलेचा विनयभंग प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यात अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो, म्हणून पैसे घेतले मात्र नोकरी लावली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता संबंधित महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. त्यावरून संबंधित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक कमलेश गांधी यांच्यासह ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी ( तिघे रा. देशपांडे गल्ली, शेवगाव ) अशा चार जणांविरुध्द शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणातील चार जणांवर गुन्हा दाखल होत नसल्याने पिडीत महिला व तिचे कुटूंबीय दोन दिवसांपासून पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसले होते. या उपोषणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे करीत आहेत.