पाथर्डी- गाळे लिलाव प्रकियेत सहभागी करुन घ्या.
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाथर्डी, तिसगाव व खरवंडी कासार आवारातील भुखंड व गाळे भाडे पट्टयाने देण्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या लिलावात सहभागी होण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून मुदतीत विहीत नमुन्यातील अर्ज व अनामत रक्कम जमा करून घेण्यास टाळाटाळ व अडवणूक केली जात असल्याची तक्रार करून या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करून आमचे अर्ज व अनामत रक्कम आपल्या कार्यालयात स्वीकारून आम्हाला भुखंड व गाळे लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे व इतर सात इच्छुकांनी सहाय्यक निबंधक पाथर्डी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे, रघुनाथ सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे, बाबासाहेब आमटे, अविनाश खेडकर, मच्छिंद्र ढाकणे, गोरक्ष ढाकणे, उमेश खोर्दे, सोमनाथ अकोलकर आदींच्या सह्या आहेत.