महाराष्ट्र
1003
10
पोलिसांच्या छाप्यात तीन लाखाचा गांजा जप्त !
By Admin
पोलिसांच्या छाप्यात तीन लाखाचा गांजा जप्त !
वालवड पिकात सुरू होती गांजा शेती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अवैध्य रित्या गाजांची लागवड करुन तीची मशागत करुन जवळ बाळगताना 3,64,500 रुपयांचा अवैध् गांजा सह एका आरोपीला पोलिसांनी गजाआड केले
अकोले तालुक्यातील मोग्रस शिवारात दिनांक 07.09.2021 ठाकरवाडी परिसरात शंकर काळु पारधी हा त्याचे वालवडीचे शेताचे बांधावर अवैधरित्या गांजाची लागवड करुन ती बाळगत असल्याची गोपनिय माहिती सपोनि मिथुन घुगे यांना मिळाली होती
. सदर माहिती मिळाल्या नंतर त्यांनी . पोलीस
अधिक्षक अ.नगर , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी
संगमनेर विभाग यांना सविस्तर माहिती देवुन त्यांचे कडुन छाप्याबाबत परवानगी घेवुन सदर ठिकाणी राजपत्रीत अधिकारी नायब तहसीलदार श्री व्ही व्ही खतोडे, , व स्टाफ असे कारवाईसाठी गेले त्या ठिकाणी खात्री केली असता सदर ठिकाणी 24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3, 64, 500 रुपयांचे 16 गांज्याची लहान मोठी झाडे मिळुन आले तसेच गांज्याची लागवड तसेच त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी रा मोग्रस ता अकोले जि अ.नगर याला ताब्यात घेण्यात आले असुन आरोपी विरुदध अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 344/2021 एन डी पी एस कायदा 1885 चे कलम 20(क)(ख)(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
आरोपीला आज दिनांक 08.09.2021 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी रवानगी केली असुन त्यास अजुन कोणी साथीदार आहे काय याचा तपास सुरु आहे.
नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, आपले गावात किंवा परिसरात कोठेही
अवैध्य गांज्याची झांडाची लागवड, विक्री अथवा वाहतुक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाणेस
कळवा, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे
सदर आरोपी हा गांजाचा व्यापार करत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा लोकांनी केल्या होत्यां मात्र त्याच्या लपवाछपवी मुळे त्याचे कडे दुर्लक्ष्य केले जात होते अनेक वर्षांपासून तो शेतात गांजा पिकवून व्यापार करत होता त्याला काहिं साथीदार असल्याचें बोलले जाते या ठिकाणी गांजा खरेदी विक्री साठी व अवैध दारू विक्रीमुळेंन येणाऱ्यांची गर्दी को रोना संसर्ग वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याबाबत यापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते परंतु असे काहीच होत नसल्याचा कांगावा आरोपीचे समर्थन करणाऱ्यांनी केला होता मात्र आज तो उघडा पडला आहे .पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले यामुळे नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद दिले!
Tags :

