पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील पूर परीस्थीतीवर प्रशासनाची आ.मोनिका राजळे यांनी घेतली आढावा बैठक
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी-शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थिती संदर्भात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील सर्व खात्यांच्या अधिकार्यांची आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी आमदार राजळे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सुचना केल्या. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जायकवाडी पाणी पुरवठा योजनेचे पाणी पूर परिस्थितीमुळे बंद असल्यामुळे संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून या योजनेच्या ठिकाणी त्वरित टँकर पाणीपुरवठा करावा असे आदेश दिले. महामार्गाच्या निकृष्ट कामा बद्दल संबंधित अधिकाऱ्यांना ही आमदार राजळे यांनी चांगलेच खडसावले. याप्रसंगी प्रांताधिकारी देवदत्त केकान, जि. प. सदस्य राहुल राजळे, गोकुळ दौंड, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपाध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे, पाथर्डीच्या गटविकास अधिकारी शितल खिडे, शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके आदी उपस्थित होते.