महाराष्ट्र
309
10
आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सुभाषराव भागवत यांचा सत्कार
By Admin
आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सुभाषराव भागवत यांचा सत्कार
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथील जालिंदरनाथ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुभाषराव भागवत यांना नुकताच पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ तसेच संत रोहिदास विचार मंच संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव भागवत यांना ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पिंपरी-चिंचवड तसेच संत रोहिदास विचार मंच संस्था यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, संत रविदास महाराज सांस्कृतिक भवन, संत तुकाराम नगर,पिंपरी-पुणे येथे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांना त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्याबददल आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर योगेशजी बहल,प्रमुखपाव्हुणे माजी आ.योगेश बापू घोलप,RCM महासचिव ज्ञानेश्वर कांबळे यांच्या शुभहस्ते तसेच महिला सल्लागार ऊर्मिला ठाकरे,प्रदेश सचिव दताञय गोतिसे,प्रदेश सहसचिव दताञय शिंदे,प्रदेश सदस्य सुदाम कांबळे,माजी नगरसेवक जितेंद्र नन्नावरे,गोरोबा गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या पुरस्काराबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव साळवे,प्रदेश सदस्या शोभाताई कानडे,महिला जिल्हाध्यक्षा रत्नमालाताई उदमले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बुंदेले,युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले,पाथर्डी तालुकाध्यक्ष रोहिदास एडके,शंकर सोनवणे,रामकृष्ण सरोदे,पञकार संदिप शेवाळे,युवक तालुकाध्यक्ष देवेंद्र अंबेटकर,संदिप उदमले, संतोष एडके,अविनाश पाचरणे,गौरव एडके, गजेंद्र उदमले तसेच पाथर्डी तालुक्यातील चर्मकार बांधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
सुभाष राव भागवत यांना यापूर्वी अनेक संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार, चर्मकार समाज भूषण पुरस्कार आदी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)