MPSC - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेसाठी ह्या आहेत अटी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत रविवारी होणाऱ्या अहमदनगर जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत हाेईल. परीक्षा 60 उपकेंद्रांवर हाेईल. परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे काम पाहतील. परीक्षेसाठी अहमदनगर जिल्हा केंद्रावर एकूण 19 हजार 152 उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. शहरातील 60 उपकेंद्रांवर (शाळा/महाविद्यालयात) उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी समन्वय अधिकारी 15 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), भरारीपथक अधिकारी 3 (उपजिल्हाधिकारी संवर्ग), उपकेंद्रप्रमुख 60 (वर्ग 1 चे अधिकारी), सहाय्यक 60, पर्यवेक्षक 187, सहाय्यक कर्मचारी 79, समन्वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक 18, समवेक्षक 798, लिपीक 60, केअर टेकर (शाळेचे) 53, बेलमन 53, शिपाई 78, पाणी वाटप कर्मचारी 196, वाहनचालक 78 या प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी 9.30 वाजता परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे. परीक्षा कक्षातील उमेदवारांच्या शेवटच्या प्रवेशाची वेळ 10.30 वाजता अशी आहे. उमेदवारांनी आयोगाकडील विहित प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांनी कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे तसेच मुखपट (मास्क), हातमोजे व सॅनिटायझर जवळ बाळगणे अनिवार्य आहे. परीक्षेकरीता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा क्षेत्रामध्ये सीआरपीसी 1973 चे कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे.