महाराष्ट्र
4515
10
साहित्यप्रेमी बाबुजी आव्हाड जन्मशताब्दी निमित्त परिवर्तनवादी गीतगायन
By Admin
साहित्यप्रेमी बाबुजी आव्हाड जन्मशताब्दी निमित्त परिवर्तनवादी गीतगायन
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, मा.आ. बाबुजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्यप्रेमी बाबुजी आव्हाड साहित्यजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाथर्डी शहर व तालुक्यातील नवकवी, लेखक, शब्दगंध साहित्य परिषद तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे साहित्यिक सदस्य मोठ्या उत्साहाने हजर होते. त्यांनी आपापल्या रचना सदर केल्या. बाबूजींना वाचनाबरोबरच परिवर्तनवादी गीताची अतिशय आवड होती.
शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांचेशी बाबूजींचे स्नेहाचे संबंध होते. जन्मशताब्दीनिमित्त बाबूजींना आदरांजली म्हणून शाहीर भारत गाडेकर, जनार्धन बोडखे, बिपिन खंडागळे, प्रा. सचिन साळवे, संजय राजगुरू, महेंद्र शिंदे यांनी वामनदादा कर्डक यांचे 'वंदन माणसाला', 'दोन राजे होऊन गेले' अशी दर्जेदार परिवर्तनवादी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर बालकलाकार राजरत्न डोळस याच्या गायनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
भगवानगडावर अध्यात्मिक शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भजन गायन करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या साहित्य जागर कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ ग्रामीण साहित्यिक कैलास दौंड यांनी केले तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पाथर्डी शाखा अध्यक्ष अविनाश मंत्री यांनी अध्यक्षपद भूषविले. कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान कवी अनंत कराड यांनी भूषविले.
याप्रसंगी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, विश्वजीत गुगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, जेष्ठ साहित्यिक रामकिसन शिरसाठ, प्राचार्य अशोक दौंड, प्राचार्य बाबासाहेब दहिफळे, विवेकानंद विद्या मंदिर चे मुख्याध्यापक शरद मेढे, अजय रक्ताटे, महेंद्र शिरसाट आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विवेकानंद विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने तर सांगता भगवानगडावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुश्राव्य पसायदान गायनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. बबन चौरे, डॉ. अशोक कानडे, डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार डॉ. सुभाष शेकडे यांनी मानले.
Tags :

