महाराष्ट्र
Breaking-'या' तालुक्यात शिवसेनेच्या दोन गटांत पानांच्या दुकानासमोर हाणामारी
By Admin
Breaking-'या' तालुक्यात शिवसेनेच्या दोन गटांत पानांच्या दुकानासमोर हाणामारी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सदर घटना कोपरगाव शहरात घडली आहे.
दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगरमधून एक महत्वाचे वृत्त आले आहे. शिवसेनेच्याच दोन गटांत हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर घटना कोपरगाव शहरात घडली आहे.
कैलास द्वारकानाथ जाधव,सागर कैलास जाधव,विशाल कैलास जाधव,समीर कैलास जाधव व दुसर्या गटातील किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनू संदीप दळवी,व निशांत राजेंद्र झावरे आदी आठ जणांचा आरोपींच्या नावात समावेश आहे.
ऋषिकेश संदीप दळवी (वय 21) याने फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शहरातील बाजारतळ येथील तो रहिवासी असून व्यापारी धर्म शाळेजवळील रसवंती चालवतो. मंगळवार दि 1 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता तो दुकानात होता.
त्यावेळी कैलास जाधव, सागर जाधव, समीर जाधव, विशाल जाधव हे तेथे आले. त्यांनी काल भांडण का केले असे विचारत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच पुन्हा आमच्याशी भांडण करशील तर तुला जिवंत सोडणार नाही असा दमही दिला. दरम्यान या भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी निशांत झावरे आला असता त्याने आमची भांडण सोडवली असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान वरील चारही आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तर दुसरी फिर्याद समीर जाधव यांनी दिली आहे. ते म्हणाले की, तो धारणगाव रोड गणेश कॉलनी येथील रहिवासी असून आपण कोपरगाव बस स्थानकाजवळ तारा पान नावाचे पान दुकान चालवतो.
मंगळवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आपण आपल्या पानाच्या दुकानावर होतो. त्या ठिकाणी आरोपी किरण संदीप दळवी, बंटी प्रकाश दळवी, मोनु संदीप दळवी, निशांत राजेंद्र झावरे आदी चार जणांनी येऊन मागील भांडणाचे कारण उकरून काढून मला शिवीगाळ केली आहे.
तेंव्ह मी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने त्यांनी त्यांचे हातातील लोखंडी गजाने आपल्या पानाच्या दुकानांचे काचेचे काउंटर तोडून नुकसान केले आहे. तसेच, आमच्याशी भांडण करता काय? असे म्हणून धमकी दिली आहे.
दरम्यान दोन्ही प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध अदखल पात्र गुन्हाक्रं.117/118/2022 भादंवि. कलम,323,504,506, 427, 504, 506, अन्वये दोन्ही गटाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Tags :
448
10