तिसगाव येथील 'त्या' प्रकारणाचा तपास वरीष्ठ अधिका-यामार्फत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांचे आदेश
शेवगाव पोलिस ठाण्याचे पी आय करणार तपास
पैसे उकळणारे 'ते' कर्मचारी येणार रडारवर
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांना तपासाच्या दृष्टीने हाती लागलेले पुरावे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी देण्यात आले आहे. या तपासणीतून जे काही पुढे येईल, त्यांनतर अधिक गती मिळून तपासाला दिशा निश्चित होणार आहे.
मृत अल्पवयीन मुलीला तिसगाव, पाथर्डी या खासगी दवाखान्यात दाखवण्यात आले, अशा ठिकाणी संबंध आलेल्या लोकांचा जबाब पाथर्डी,शेवगाव पोलिस ठाण्यात तपासी अधिकारी घेत आहे.