नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या नगर तालुक्यातील खडकी येथील भाविकांच्या दोन वाहनांवर कंटेनर आदळून झालेल्या विचित्र अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच जण गंभीर आहेत. सुपे-मोरगाव मार्गावर बारामती तालुक्यातील सुपे गावाजवळ सोमवारी (दि.२४) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात बाबासाहेब वाडेकर, स्वाती नवनाथ रोकडे, संध्या अनिल रोकडे, तात्या काळे, काजल विठ्ठल कोकरे, नाथा सतीश रोकडे, अंबादास भाऊसाहेब रोकडे, नवनाथ रोकडे, विठ्ठल शिवाजी कोकरे (सर्व रा.खडकी ता.नगर) हे जखमी झाले आहेत. अपघात घडला त्यावेळी कंटेनर कोसळ्याचा मोठा आवाज आल्याने गावकरी मदतीसाठी धावले. जखमींना तातडीने सुपे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद चाफेकारंडे यांनी जखमींवर उपचार केल्याची माहिती डॉ.दिलीप झेंडे यांनी दिली. दरम्यान, पोलिस उपनिरिक्षक एस.जी.शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालक फरारी झाल्याचे शेख यांनी सांगितले.