महाराष्ट्र
119
10
संत रविदास महाराज यांना ६४५ व्या जयंती निमित्ताने पाथर्डी येथे अभिवादन
By Admin
संत रविदास महाराज यांना ६४५ व्या जयंती निमित्ताने पाथर्डी येथे अभिवादन
पाथर्डी प्रतिनिधी
जगदगुरु संत रविदास महाराज ६४५वी जयंती निमित्त पाथर्डी शहरातील नाईक चौक या ठिकाणी चर्मकार संघर्ष समिती तसेच चर्मकार उत्सव समितीच्या वतीने राष्ट्रीय संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रतिमा पूजन करतांना शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे,नगराध्यक्ष डाँ.मृत्यूजंय गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गटनेते बंडू पाटील बोरुडे,जेष्ठ नगरसेविका मंगलताई कोकाटे, नगरसेवक रमेश गोरे,बजरंग घोडके, महेश बोरुडे,ता.ख.वि.संघाचे माजी संचालक श्रीधरराव भागवत, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, युवासेना शहरप्रमुख शिवव्याख्याते सचिन नागापुरे,डॉ. सुहास उरणकर, आरपीआयचे रविंद्र आरोळे,बाबा राजगुरु,महेश अंगरखे,किसान सेनेचे बाळासाहेब ढाकणे, हुमायुम आतार, शन्नोभाई पठाण यांच्या उपस्थित संपन्न झाला.
याप्रसंगी आमदार राजळे बोलतांना म्हणाल्या, संत रविदास महाराज यांनी१३ व्या शतकात अंधश्रद्धेवर मात करत समतेचा विचार देत महान असे कार्य केले तसेच चर्मकार संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यांचे सामाजिक कार्य समाजाला आदर्शवादी आहे. हे सर्व समाजाने शिकले पाहिजे.
तसेच बंडु पाटील बोरुडे म्हणाले,
सर्व संतामधील संत रविदास महाराज यांचे कार्य महान आहे. त्यांनी शांतीचा मार्ग अवलबंला. तसेच चर्मकार समाजाने सर्व पक्षीय जयंतीला मान दिला असुन, सामाजिक कार्यात सुभाषराव भागवत यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी मृत्युंजय गर्जे,शिवव्याख्याता सचिन नागापुरे,हुमायुम आतार,बाबा राजगुरु,महेश अंगरखे यांनी आपले मनोगत करत , अभिवादन करुन समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाषराव भागवत,रोहिदास एडके,भारत गाडेकर,रामकिसन सरोदे,शंकर सोनवणे,दताञय साळवे, अशोक कदम, संदिप शेवाळे,संदिप उदमले,दिलीप बताडे,अनिल एडके, विजय उदमले,जालिंदर गायकवाड, सुनिल एडके,निलेश सातपुते,गुलाब भगत,गौरव एडके,सचिन तरटे,सुयोग एडके,लक्ष्मण एडके,रविराज गायकवाड,बंडू दानापुरे,सुखदेव मर्दाने,लक्ष्मण काळोखे आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक शंकर सोनवणे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संदिप शेवाळे यांनी केले. सुञ संचालन चर्मकार संघर्ष समितीचे युवक प्रदेश अध्यक्ष सुभाषराव भागवत यांनी केले तर महेश अंगरखे यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags :

