गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्री गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस भाविकांनी गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली. आजचा दिवस गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचा आहे. उत्सवाची सांगता देखील उत्साहाने व्हायला हवी, यानुसार गणेश मूर्तीचे विसर्जन वाजत गाजत केले जाते. ' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ' अशा जयघोषात भाविक बाप्पाला निरोप देतात. यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत चालू राहील.
अनंत चतुर्दशी तिथी प्रारंभ - 19 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे 05:59 वाजता
अनंत चतुर्दशी तिथी समाप्ती - 20 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे 05:28 वाजता
विसर्जनासाठी शुभ मुहूर्त
सकाळी मुहूर्त – सकाळी 7:39 ते दुपारी 12:14 वाजेपर्यंत
दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 वाजेपर्यंत
संध्याकाळी मुहूर्त- संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 वाजेपर्यंत
गणपती विसर्जन पूजा विधी
-सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार पूजा करावी.
-गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा.
- विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावी.
गणपती विसर्जन मंत्र :
यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।
गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी. मग मूर्ती उचलून पाण्यात विसर्जित करावी