पाथर्डी- डाॕक्टरकडून खंडणी वसूल करणाऱ्या 'या' व्यक्तीवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी: माहितीच्या अधिकारात माहिती मागून खंडणी वसूल करणाऱ्या चौघा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. तनपुरवाडी शिवारातील मोहटादेवी फाट्यावर खंडणीचे रक्कम घेण्यास आलेल्या आरोपींवर पोलिसांनी छापा टाकत एकाला अटक केली असून तीन जण फारार झाले आहे. शहरातील कोविड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या शैलेंद्र प्रल्हाद जायभाये ( रा. खरवंडी ), मिथुन दगडू डोंगरे (रा. जवळवाडी ), नवनाथ उगलमुगले (रा. काटेवाडी ), मछिंद्र राधाकिसन आठरे ( रा.आनंदनगर, ता. पाथर्डी) असे आरोपींची नावे असून आठरे याला पोलिसांनी घटनस्थळी ताब्यात घेतले. आरोपींमध्ये दोन माध्यमिक शिक्षक, एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक राजकीय पदाधिकारी आहे.