आठ गावामध्ये आजपासून कडक लाॕकडाऊन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये रविवारी टाळेबंदीनंतर आता आणखी ८ गावांत नव्याने टाळेबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन केलेल्या गांवाची संख्या ६९ झाली आहे. दरम्यान, टाळेबंदीला विराेध हाेऊ लागला आहे. पारनेर तालुक्यात व्यापाऱ्यांनी टाळेबंदीच्या विराेधात आंदोलन केले आहे.
राज्यात काेरोना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. नगर जिल्ह्यात मात्र काेराेना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर उपाय हाती घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात ६१ गावांमध्ये टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर आता आणखी आठ गावांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, अजमपूर, शेवगावमधील वडुले बुद्रुक या गावांतमध्ये टाळेबंदीचा आदेश देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन टाळेबंदी असलेल्या गावांमध्ये करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहे.