कळसपिंपरी गावात संत सेवालाल महाराज जयंती उत्सहात साजरी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यापासून 20 किमी असणारे कळसपिंपरी हे गाव या गावामध्ये विविध समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.
याच गावात बंजारा समाजाचे लोक पण राहतात. दि 15 फ्रेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती या गावातील सर्व समाज -बांधवानी एकत्र येऊन थाटामाटात साजरी केली.
प्रथम कळसपिंपरी गावच्या ग्रामपंचायत वतीने दबंग सरपंच मा. दिगू शेठ भवार व नेहरकर भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
यांनतर गणेश नगर तांडा येथे सर्व बंजारा समाज एकत्र होऊन भव्य अशी डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली..
मग संत सेवालाल महाराज यांचे जि. प. सदस्य राहुल दादा राजळे यांच्या शुभ-हस्ते मंदिर कामाचे उदघाटन करण्यात आले.
या जयंती निमित्त आलेल्या सर्व भक्तासाठी सुंदर असे भोजनाचा आयोजित कार्यक्रम यावेळी पार पडला.
यावेळी जि.प. सदस्य राहुल दादा राजळे, कळसपिंपरी गावचे सरपंच दिगू शेठ भवार, चेअरमन नवनाथ भवार,भाजपा पाथर्डी सरचिटणीस नितीन भवार, उपसरपंच संजय पवार, अनिल पवार, श्रीराम पवार, यमाजी चव्हाण, प्रभाकर पवार, माणिक राठोड, आसाराम जाधव, नानासाहेब राठोड, रामचंद्र जाधव, मछिंद्र चव्हाण, शिवाजी राठोड, रविकिरण राठोड, रमेश जाधव, अरविंद राठोड,सतीश चव्हाण, राहुल बुळे,गणेश भवार, बबन भवार, दत्ता शेळके, विशाल शेळके, गणेश मापारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आभार ओमकार राठोड यांनी केले व कार्यक्रम चे नियोजन सचिन चव्हाण, संजय पवार, विनोद चव्हाण यांनी केले.