महाराष्ट्र
सफाई कामगाराला नगरसेवकाने केली मारहाण करुन दमदाटी
By Admin
सफाई कामगाराला नगरसेवकाने केली मारहाण करुन दमदाटी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तारकपूर परिसरात सफाईचे काम करत असताना महापालिकेच्या सफाई कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह दोघांविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक राजेंद्र भिकनदास कंत्रोड व मनोहर खुबचंदानी (दोघे रा. संधी कॉलनी, तारकपूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महापालिका कर्मचार्यांना मारहाण झाल्याचा आम्ही निषेध करतो. मारहाण करणार्यांवर कारवाई झाली पाहिजे. ज्या परिसरात मारहाण झाली त्या तारकपूर परिसरातील सफाई कामावर कर्मचार्यांनी बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.
सफाई कर्मचारी सिध्दांत रणजित कोहिर (वय 23 रा. नालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी तारकपूर परिसरातील झुलेलाल चौकात ही घटना घडली. कोहिर हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामावर आल्यानंतर त्यांनी निर्मलनगर परिसरात काम केले. त्यानंतर त्यांच्यासह त्यांच्यासोबतचे कर्मचारी अनुप अजित चव्हाण यांना सुफरवायझर कन्हैय्या चावरे यांनी तारकपूर येथे काम करण्यासाठी बोलविले. त्यांना झुलेलाल चौकातील चेंबर ब्लकचे काम करण्याचे चावरे यांनी सांगितले. तेव्हा कोहिर व चव्हाण हे झुलेलाल चौकात काम करत असताना तेथे माजी नगरसेवक कंत्रोड आले. त्यांनी कोहिर यांच्या हातातील फावडे घेत येथील काम सोडून माझे काम आधी करा, तुम्ही लोक काम करत नाही म्हणून मी तुमची आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. कर्मचार्यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता कंत्रोड यांनी कोहिर यांना हाताने मारहाण केली. तसेच तेथे असलेल्या खुबचंदानी यांनी देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भादवि कलम 353, 323, 506, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Tags :
471
10