प्रथमच होणार 'या' आमदाराच्या नावाने 'या' गावात प्रवेशद्वार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर : रुईछत्रपती येथील दिवंगत भागुजी केसुजी साबळे यांच्या स्मरणार्थ , सरपंच विजया बंडूजी साबळे यांच्या सौजन्यातून स्वखर्चाने प्रवेशव्दाराची उभारणी करण्यात येणार आहे. पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांचे सार्वभौम व परोपकारी कार्यावर त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर चाहतावर्ग निर्माण झाला आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आमदार निलेश लंके यांच्यावर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे . त्याच प्रमाणे पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती या गावातील युवा उद्योजक बंडू साबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला तसेच रुई छत्रपतीच्या विद्यमान सरपंच विजया बंडूजी साबळे यांच्या सहकार्यातून गावची शोभा वाढविण्यासाठी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात आमदार निलेश लंके यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी देत गावच्या विकासात भर घातली आहे . त्यामुळे साबळे कुटुंबीयांनी या लोकनायकाच्या सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन त्यांच्या नावाने पारनेर तालुक्यात प्रथमच भव्य असे प्रवेशद्वार स्वर्खचाने उभारण्याचा निर्णय घेतला आहे .