तरुणाने सेल्फी व्हिडिओ शुट करत शेतकऱ्यांच्या पोटी परत जन्माला येणार नाही म्हणत केली आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सूरज यादव हा पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे राहत असे. एका अज्ञात स्थळी बसून सूरजने सेल्फी व्हिडिओ शूट करून विषाची बाटली दाताने उघडली. त्यानंतर त्याने विष प्राशन करून बाटली फेकून दिली. सूरजला पंढरपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
'शेतकऱ्यांच्या पोटी परत जन्माला येणार नाही', म्हणत तरुणाची आत्महत्या
मगरवाडी येथे सूरज जाधव याची शेती आहे. मात्र, शेतीत म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सूरज हताश झाला होता. त्यातूनच टोकाचे पाऊल उचलत 'शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही
शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर' असे म्हणत सूरजने विषाचा कडवा घोट घेतला आहे. सदर घटनेमुळे पंढरपूरसह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे एका तरुण शेतकऱ्याने पंढरपूरात विष प्राशन करुन आत्महत्या केली ( Pandharpur Young Farmer Suicide ) आहे. सूरज यादव असे या तरुणाचे नाव आहे.
शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज ओव्हर' असे म्हणत पंढरपूरात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली ( Pandharpur Young Farmer Suicide ) आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूरज यादव असे या तरुणाचे नाव आहे. सूरजने विष प्राशन करताना व्हिडिओ काढला होता. तो आता व्हायरल झाला आहे.