पाथर्डी- टेम्पो पुलाला धडकून अपघात;चालक जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी-अहमदनगर रोडवरील माळी बाभूळगाव येथील पुलाच्या चालू असलेल्या कामात आज पहाटेच्या सुमारास टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट पुलाला धडकून अपघात झाला.यामध्ये टेम्पोचे नुकसान झाले असून चालक देखील जखमी झाला आहे.