पावसाची जोरदार हजेरी, पहा कोठे किती बरसला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सध्या शेतकऱ्यांसह सर्वच लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत आहेत. परंतु काल गुरुवारी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली .
रात्री 9.30 दरम्यान नगर शहर, उपनगरात आणि एमआयडी परिसर तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. शहरात साधारण 20 ते 25 मिनीटे जोरदार पाऊस झाला.
नगर तालुक्यात अनेक गावांत जोरदार वार्यासह पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील भोकर व खोकर शिवारात काल रात्री वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला.
अनेक तालुक्यांत काल मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे.
काल आभाळ अन उष्णता दोन्हीही होते. अनेकांनी आज पाऊस येणार असा अंदाज लावलाही होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोराच्या वार्यासह विजांच्या कडकडाटात सुरुवात झाली.
त्यानंतर पावसाने हजेरी लावली. दरम्यान या पावसाने अनेक शेतकऱ्यांना आनंदित केले असले तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र याचे नुकसान झालं आहे.
काही शेतकर्यांचा कांदा शेतातच आहे, त्यांची या पावसाने धांदल उडाल्याचे चित्र दिसले. ज्या शेतकर्यांकडे कांदाचाळी नाहीत ते प्लास्टीक कागदाच्या शोधात होते तर तुरळक प्रमाणात शेतात पडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाल्याचे दिसले.