खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सातबार्यावर करण्यासाठी लाच मागणार्या दोघांवर गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सातबार्यावर करण्यासाठी वीस हजारांच्या लाचेची मागणी करणार्या शेवगाव तलाठी कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर विजय धनवडे व त्याचा खासगी साथीदार आरिफ पठाण (दोघेही रा.शेवगाव, जि.नगर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
दोघांवरही शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगाव येथील तक्रारदाराने खरेदी केलेल्या दोन गुंठे जमिनीची सातबार्यावर नोंद करण्यासाठी 20 हजारांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती.
त्यानुसार, पथकाने गुरूवारी (दि.20) सापळा रचून कारवाई केली. आरोपी पठाण याने तक्रारदाराकडे नोंद करण्यासाठी 20 हजाराची मागणी केली. तडजोडीअंती 18 हजार रूपये पंचासमक्ष लाच मागणी केली. तसेच तलाठी कार्यालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर विजय धनवडे याने हे पैसे 'भाऊसाहेबला मॅनेज करण्यासाठी द्यावे लागतात, जेवढे मागितले तेवढे द्यावे लागतील तरच तुमची नोंद होईल', असे म्हणून लाचेची मागणी केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, गहिनीनाथ गमे, पोलिस नाईक रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राहुल डोळसे यांनी केली.