भगरीच्या पिठाची भाकर खाल्ल्याने तब्बल इतक्या जणांना विषबाधा
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने
गावातील अनेक महिला पुरुषांनी नवरात्रीचे उपवास धरले आहेत.
उपवासाच्या पहिल्याच दिवशी गावातील काही महिलांनी करंजी येथील एका
किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणून रात्री या पिठापासून भाकरी तयार केल्या. त्या भाकरी खाल्ल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही लोकांना उलट्या, जुलाब होऊ लागल्याने त्यांना घरातील
इतर मंडळींनी तात्काळ तिसगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या भगरीच्या पिठामुळे करंजीसह खंडोबावाडी, मराठवाडी येथे देखील काही लोकांना त्रास झाला असून
काहींवर नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर करंजी येथील प्रकाश गोवर्धन राठोड, लिलाबाई लक्ष्मण चव्हाण, अनिता प्रकाश राठोड, रामदास रावजी चव्हाण,
गीताबाई रामदास चव्हाण, अशोक तारू चव्हाण, सुशीला अशोक चव्हाण, रमेश संतोष चव्हाण या आठ लोकांना तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
अन्नातून फूड पॉइजनिंग झाल्यामुळे काल रात्री करंजी येथील आठ व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत त्यांना डीस्चार्ज दिला जाईल.
- डॉ. गणेश साळुंखे / डॉ. वैशाली शिरसागर