आकांक्षा औटे हिची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या युवती पाथर्डी तालुकाध्यक्षपदी निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
स्वाभिमानी मराठा महासंघाच्या युवती तालुकाध्यक्षपदी पाथर्डी तालुक्यातील राघूहिवरे येथील कु. आकांक्षा औटे हिची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे व युवती जिल्हाध्यक्ष वैशाली देशमुख, संस्थापक डॉ. कृषीराज टकले यांनी निवड केली आहे, आकांक्षा औटे पदवीधर असून समाजकार्य करण्याची इच्छा प्रकट केली आहे, तिच्या निवडीबद्दल डॉ.
कृषिराज टकले, सुभाष गागरे, सचिन भोसले, प्रदेशाध्यक्षा सुरेखाताई डौले, वैशाली देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड,डॉ. सुनील उगले अनिल सुपेकर, निलेश दरेकर सचिन जगताप, बाळासाहेब निपुनगे तसेच संघटनेच्या इतर सदस्यांनी तिचे अभिनंदन केले.मराठा समाजासाठी, महिला, युवतींसाठी काम करणार असल्याचे आकांक्षा औटे यांनी यावेळी सांगितले.