विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातल्या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील ६० हजार शिक्षकांना याचा फायदा होईल. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.
मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की, २० ते ४० टक्के आणि ४० ते ६० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
पात्रता पूर्ण न करु शकलेल्या संस्थांना वगळून सर्वच्या सर्व शाळांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जवळपास १ हजार १६० कोटी रुपयांचं पॅकेज शिक्षकांसाठी जाहीर करत असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. ज्यांनी मागण्याही केलेल्या नाहीत त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे.