महाराष्ट्र
तरुणांनी प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे -प्रा. किसन चव्हाण
By Admin
तरुणांनी प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे -प्रा. किसन चव्हाण
पाथर्डी- प्रतिनिधी
-छत्रपती शिवाजी राजेंनी वडील शहाजीराजेसारखी सरदारकी न करता बहुजन समाजातील स्वाभिमानी तरुणांना एकत्रित करून रयतेचं व कुणब्याचं राज्य निर्माण केलं. शिवाजीराजेंनी रुळलेल्या वाटेने न जाता, स्वतःची नवीन वाट निर्माण करून जुलमी मुघलांची व संस्थानिकांची दादागिरी मोडून काढली, तीच प्रेरणा घेऊन आजच्या बहुजन समाजातील तरुणांनी प्रस्थापित संस्थानिक कारखानदारांच्या सतरंज्या न उचलता नवीन वाटा निर्माण करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. इथल्या संस्थानिकाना त्यांची पोरं समाजावर युवा नेते म्हणून लादायाची आहे. आपल्याला कोणीही मोठं करणार नाही. आपल्यालाच मोठं व्हावं लागनार आहे. आपल्यातलेच तरुण भविष्यात निवडून दिले तरच सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सुटतील, असे प्रेरणादायी आणि तरुणांमध्ये स्फुल्लिंग पेटवणारे विचार वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील घोंगडी बैठकीत व्यक्त केले.
मंगळवारी पाथर्डी तालुक्यातील शिंगवे कामत येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन आणि घोंगडी बैठक पार पडली. सुरुवातीला ढोलताश्याच्या गजरात प्रा. किसन चव्हाण यांची गावातून मिरवणूक काढून शाखेच्या फलकाचे अनावरण करून ग्रामदैवत मळगंगा मातेच्या सभागृहात घोंगडी बैठक पार पडली. यावेळी शिवसेना नेते स्व. अनिलराव कराळे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, संजय उगले,शिवसेना नेते अंबादास आरोळे यांची भाषणे झाली.
यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख,डॉ अंकुश गायकवाड, माया डोळस,सौरभ काकडे,लक्ष्मण मोरे,दगडू बोरुडे,अजिनाथ शिंदे,अतुलभाऊ गडाख,रावसाहेब शिंगटे, सुरेश बर्फे,बाळासाहेब कोळसे,कैलास धनवटे,डॉ संजय कराळे ,सुनिल कराळे,बाळासाहेब कराळे,गौतम कराळे,आदिनाथ कराळे, अमोल भोसले,भाऊसाहेब मिरपगार, घनश्याम मिरपगार, सतीश मिरपगार, शरद मिरपगार, नाना मिरपगार, शिवाजी भोसले, राजेंद्र भोसले,गणेश कराळे,सतिष भोसले,गौतम कराळे,दादा ब्राम्हणे,अंबादास काळे यांसह ग्रामस्थ महिला भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उद्धव दुशिंग यांनी तर आभार शाखा अध्यक्ष अनिल मिरपगार यांनी मानले.
Tags :
16510
10