महाराष्ट्र
रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा,'विकासाच्या कामात अडथळे आणलं तर खपून घेणार नाही'
By Admin
रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा,'विकासाच्या कामात अडथळे आणलं तर खपून घेणार नाही'
तालुक्यातील विकासाच्या आड आल्यास मी पण गप्प बसणार नाही; आ. पवार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांनी अन्नसुरक्षा योजनेमधील मतदार संघातील अठरा हजार लाभार्थ्यांसाठी प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बोलताना श्री पवार म्हणाले की, कर्जत जामखेडच्या विकासाचा निधी कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही मात्र या विकासाच्या आड जर कोणी आले तर सर्वसामान्य जनतेचा रोहित पवार हा कार्यकर्ता मात्र गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिला. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत शासनाकडून स्वस्त धान्य वितरित केले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून कर्जत व जामखेड मतदारसंघातील अनेक नागरिक पात्र असताना देखील त्यांना विविध कारणांमुळे धान्य मिळत नसल्याचे लक्षात आले.
त्यानंतर मी यामध्ये विशेष लक्ष घातले आणि प्रांताधिकारी, दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व त्यांची सर्व महसूल व ग्रामविकासची यंत्रणा यासोबतच सरपंच, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा अधिकारी यांना बरोबर घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन बैठका घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२००३ अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी विशेष अभियान राबविले. त्यानंतर दोन्ही तालुक्यातील एकत्रित १८ हजार ८७५ पात्र गरजू लाभार्थ्यांना कर्जत आणि जामखेड येथे स्वतंत्र शिधापत्रिकेचे वाटप करीत आहे.
अधिकाऱ्यांना कार्यक्रमास येण्यापासून रोखले
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की आज इथे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या हिताचा कार्यक्रम असताना माजी मंत्री राम शिंदे यांनी आता आमची सत्ता राज्यात आली आहे, असे म्हणून कार्यक्रमाला येण्यापासून रोखले आहे, असे जाहीर पणे सांगितले. मात्र मी करत असलेल्या विकास कामांमध्ये जर कोणी अडकाठी आणली तर त्यांना उत्तर देण्यास मी सक्षम आहे. असा इशारा दिला. राज्यात कोणाचीही सरकार असली तरी मी स्वतः संबंधित विभागाच्या मंत्र्यांना जाऊन विनंती केल्यानंतर ते निश्चित कर्जत जामखेड साठी निधी देतील असा मला विश्वास आहे असे रोहित पवार म्हणाले.
जामखेड- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला असला तरी अन्यमंत्र्यांचा शपथविधी व खातेवाटप अद्याप झाले नाही. दोन्ही पक्षातील बरेच नेते आणि आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत.
त्यात आता कोणाची वर्णी लागते हे पहाणे महत्वाचं ठरणार आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद लवकरच रिक्त होणार आहे. आता या पदासाठी नुकतेच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले प्रा. राम शिंदे यांचे नाव पुढे आले असून "ओबीसी' चेहरा म्हणून आ. शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन राज्यात "नव समीकरण' करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर दुसरीकडे राज्यातील सत्तांतरानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यामधील संघर्ष तीव्र होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकासाच्या कामात अडथळे आणले तर खपून घेणार नाही, असा इशाराच आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिला आहे. दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात अन्नसुरचना योजनेअंतर्गत शिधापत्रिका वाटप कार्यक्रमाच्या वेळेस रोहित पवार यांनी राम शिंदेंवर टीकाही केली आहे.
दरम्यान, अडीच वर्ष कोमात असलेल्या कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना राम शिंदे यांना मिळालेल्या आमदारकीमुळे 'नवं चैतन्य' निर्माण झाले आहे. ही अडीच वर्ष प्रा. शिंदेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूप अडचणीची गेली. अनेकवेळा संघर्षाला तोंड द्यावे लागले. सत्तेपुढे काहीच न चालल्याने गप्प बसावे लागले. पण आता आमदार झाल्याने अडीच वर्षांचा 'वनवास' संपल्याने 'राम' आता नवी उमेद घेऊन राजकीय रणांगणात उतरले आहेत.
Tags :
447
10