गाळप न झालेल्या ऊसास सरकारने एकरी एक लाख अनुदान द्यावे- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासुन पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शेतकरी एक हक्काचे पिक म्हणुन ऊसाकडे वळला व मोठया प्रमाणात महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. ऊसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखाने गाळप करु शकत नसल्यामुळे ऊस गाळप न झालेला शेतकरी मोठया संकटात सापडला आहे. ऊस गाळप न झाल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने एकरी एक लाख रुपये अनुदान जाहिर करावे, अशी मागणी ऊस गाळप न झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी युनीयन अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रामध्ये ढाकणे यांनी म्हटले आहे की, ऊस गाळप न झालेल्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायट्या , बँका, खासगी पतसंस्था व सावकाराकडून कर्ज घेतले आहे. ऊस गाळप न झाल्यास सोसायट्या, बँका व खासगी सावकरांच्या तगाद्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन टोकाची भुमिका घेऊन वेगळे पाऊल उचलण्याच्या आत सरकारने ऊस गाळप न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकरी एक लाखाची मदत करुन ऊस गाळप न झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी ऊस गाळप न झालेल्या शेतकऱ्यांच्या वनीने शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी ना. पाटील यांच्याकडे केली असुन ऊस गाळप न झालेल्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत व संवेदनशील प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.