डॉ.आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज दिपक दौंड, उत्कृष्ट फलंदाज अर्थव चव्हाण
पाथर्डी- प्रतिनिधी
बारामती येथे झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत पाथर्डी येथील एस व्हि नेट क्रिकेट ॲकॅडमी संघ विजेता ठरला.
८ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत झालेल्या डॉ. आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धेत पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, बारामती येथील संघांनी सहभाग घेतला होता. रंगतदार ठरलेल्या या सामन्यात एस व्ही नेट ॲकॅडमी संघाने विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेत दीपक दौंड उत्कृष्ट गोलंदाज तर अर्थव चव्हाण उत्कृष्ट फलंदाज ठरला. एस व्ही नेट ॲकॅडमी च्या खेळाडूंनी सामन्यात चमकदार अशी कामगिरी दाखवली. संपूर्ण स्पर्धेत दीपक दौंड याने १२ विकेट, अर्थव चव्हाण १० विकेट, आदित्य चव्हाण ६, विकेट प्रथमेश शिरसाट ३ विकेट घेतल्या. तसेच आदित्य लबडे याने फलंदाजी मध्ये उत्कृष्ट अशी चमक दाखविली.
या सर्व खेळाडूंना एस व्ही नेटचे प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पाथर्डी तालुका क्रिकेट असोशियन चे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताप व कोरडगाव येथील साई क्लिनिकचे डॉ. संतोष तुपेरे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.