कंपनीच्या बॕट-या चोरणारा शेवगाव तालुक्यातून जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई येथील इसबील कंपनीत नोकरी करणार्या कर्मचार्याने 24 बॅटर्या चोरून नेल्या होत्या. याबाबत सोनई पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरिल पांढरीपूल येथून जेरबंद केले आहे.
शिवाजी मोहिनीनाथ बडे (रा. लांडे वस्ती, ता. शेवगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने इसबील कंपनीत नवीन 24 बॅटर्या बसवून जुन्या 48 हजार रूपये किंमतीच्या 24 बॅटर्या कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये जमा न करता चोरून नेल्या होत्या. याबाबत कंपनीच्या कर्मचार्यांविरूद्ध दि. 15 जून 2022 रोजी आकाश प्रकाश गायकवाड (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांनी सोनई पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. तेव्हापासून कंपनीचा कर्मचारी फरार होता. दरम्यान, कर्मचारी शिवाजी बडे हा पांढीपूल येथे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने पांढरीपूल येथे सापळा लावून कंपनीचा कर्मचारी शिवाजी बडे याला अटक केली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला सोनई पोलिस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर, विशाल दळवी, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, आकाश काळे आदींच्या पथकाने केली.