महाराष्ट्र
ट्रक व जीपच्या भीषण अपघातात ७ ठार, १२ जखमी
By Admin
ट्रक व जीपच्या भीषण अपघातात ७ ठार, १२ जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला आहे.
हा अपघात ओव्हरटेक करण्याचा नादात झाला असल्याची माहिती देण्यात आली असून अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी सुनील जायभाय, बर्दापूर चे एपीआय खरात, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
लातूर अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी (ता.२३) सकाळी १० च्या सुमारास ट्रक आणि क्रुझरच्या भीषण अपघातात सात जण ठार, तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी ३ जण गंभीर आहेत.
घटनेतील जखमींवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतात पाच महिला, एक पुरूष आणि एका बालकाचा समावेश आहे.
या अपघातात निर्मला सोमवंशी (वय ३८), स्वाती बोडके (वय ३५), शकुंतला सोमवंशी रा.आर्वी (वय ३८), सरोजबाई कदम रा. मळवटी (वय ३७), चित्रा शिंदे रा.कासारखेडा (वय ३५), खंडू रोहिले रा. लातूर जीप चालक (वय ३०), ओळख न पटलेला बालक (वय ९) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, राजामती सोमवंशी (वय ५०), सोनाली सोमवंशी (वय २५), रंजना माने (वय ३५), परिमला सोमवंशी (वय ७०), दत्तात्रय पवार (वय ४०), शिवाजी पवार (वय ४५), यश बोडके (वय ९), श्रुतिका पवार (वय ६), गुलाबराव सोमवंशी (७५), कोमल जाधव (वय ३०), साक्षी जाधव (वय १६), प्रथमेश सोमवंशी (वय १४) सर्व रा. आर्वी (जि.लातूर) अशी जखमींची नावे असून, या सर्वांवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राडी (ता.अंबाजोगाई) येथील उत्तमराव गंगणे यांच्याकडे शनिवारी मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील आर्वी व साई येथून त्यांचे नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. अचानक अशी काळाने झडप घातलेल्या या घटनेत सात जण जागीच ठार झाले. परिसरातील नागरीक व पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ स्वाराती रुग्णालयात पाठविले.
अरुंद रस्त्याचे बळी
बर्दापूर पर्यंत चौपदरी असलेला हा महामार्ग पुढे अरुंद आहे.. त्यामुळे मोठी वर्दळ असेलल्या या मार्गावर अनेकांचे बळी जात आहेत. अनेकदा मागणी करूनही या रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग निघेल, असा सवाल नागरिकांतून विचारल्यावर जात आहे.
अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने येत होते. दरम्यान, सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जीपला जोराची धडक दिली. यात पाच महिला व एक चालक जागीच ठार झाले तर दहा जण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह व जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हा अपघात इतका भीषण होता की सायगावजवळ अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. अपघातात क्रुझर गाडीतील पाच महिला आणि एक बालक जागीच ठार झाले तर एका पुरुषाचा रुग्णालयात उपाचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नसून अपघातात जखमी झालेल्या लोकांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Tags :
1099
10