जवाहर विद्यालयाच्या वतीने एसीपी स्वाती खेडकर यांचा सन्मान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील जवाहर विद्यालयाच्या वतीने स्वाती खेडकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदी निवड झाल्याबद्दल नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला.
खेडकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाथर्डी येथील श्री तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्या कानिफनाथ विद्या प्रसारक मंडळाचे मा. सचिव स्व. प्रा. रामनाथ खेडकर यांच्या कन्या आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ खेडकर, शहादेव डमाळे, रघुनाथ खेडकर, सुनिल खेडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, धनश्री शिरसाट, सुरेखा माळवे, शिवनाथ खेडकर यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती स्वाती खेडकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन सविता बडे यांनी केले तर आभार वैभव खुटाळे यांनी मानले.