एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहे.
अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला असताना अनेक कारखान्यांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा संघर्ष काही केल्याने संपताना दिसत नाही. असे असताना आता अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेचा प्रश्न अखेर वर्षभराने मार्गी लागला आहे.
यामध्ये सन 2020-21 मधील एफआरपी रक्कम ही नागवडे सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्याकडे होती. या रकमेतील 63 लाख 79 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने सुनावणी दरम्यान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे येथील शेतकरी आनंदात आहेत.
श्रीगोंदा सहकारी कारखानाच्या गाळप हंगाम एफआरपीची शिल्लक रक्कम बाकी होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारात पाठुपरावा केला होता. यामध्ये याबाबतची माहिती समोर आली होती. याबाबत माहिती निदर्शनास येताच पैसे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांनी एकच आनंद व्यक्त केला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने केलेल्या सुनावणीचा परिणाम इतरत्रही होऊ शकतो. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे लक्ष आता आपल्या कारखान्यांकडे लागले आहे. यामुळे आता इतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकरी याबाबत आक्रमक झाले होते. यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.