Breaking-हिरो होंडां व स्कार्पिओचा अपघात एक ठार, एक गंभीर जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की भेंड्यावरुन दुचाकी हिरो होंडा एम.एच. १७ ए.एम.९०१ वर करण जयसिंग सुपेकर (वय २० ) व अर्जुन नवनाथ सुपेकर ( वय १९) असे दोघे जण चालले होते . सौंदाळ्या कडुन येणारी स्कार्पिओ
(एम.एच.१७ ए.जे.३०३१ ) गाडीवर हे दोघे जोरात धडकले . ही धडक इतकी जोरात होती, की करण सुपेकर हा जागीच ठार झाला. तर अर्जुनच्या मांडीचे हाड मोडले असुन त्यास गंभीर अवस्थेत नेवासा फाटा येथील
साई सेवा हाॕस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत करण याच्या मृतदेहाचे नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.या घटनेने सौंदाळा गावावर शोककळा पसरली आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे नेवासा - शेवगाव राज्यमार्गावरील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना पेट्रोल पंपासमोर स्कार्पिओ व हिरो होंडा दुचाकी
यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला .ही घटना आज शुक्रवारी दिनांक २५ रोजी ४ वाजता भेंडा - सौंदाळा रस्त्यावर ज्ञानेश्वर कारखाना पेट्रोल पंपा समोर घडली.