महाराष्ट्र
जबरी चोरीचा बनाव करणारा चालक मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात
By Admin
जबरी चोरीचा बनाव करणारा चालक मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
फायनान्सची रक्कम बुडविण्याच्या उद्देशाने चालक व मालकांनी जबरी चोरीचा बनाव करून नेवासा येथून गव्हासह चोरी गेलेला आयशर टेम्पो 14 लाख 88 हजार 864 रुपये किंमतीचा मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
याबाबत औरंगाबाद येथील टेम्पो चालक सुनील रमेश खिरडकर यांनी फिर्याद दिली आहे. यात खिरडकर यांनी म्हटले की, 2 ऑक्टोबर रोजी लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) येथून 10 टन 600 किलो गव्हाच्या बॅग भरून नगरकडे जातानाना सायंकाळी साडे सहा वाजता खडका फाटा ते नेवासा फाटा रोडवर टोलनाक्याचे पुढे सुमारे 1 किलोमीटर अंतरावर तीन लोकांनी, 'आम्ही फायनान्स कंपनीचे लोक आहोत,' असे सांगून मला गाडीचे खाली उतरून घेत, लाथाबुक्याने मारहाण केली. गाडीची चावी घेऊन गाडी (एम.एच.20 ई.जी. 8161) व त्यामधील 10 टन 600 किलो गहू, असा एकूण 14 लाख 88 हजार 864 रुपयेचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. नेवासा पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी व सहकार्यांनी फिर्यादीकडे आयशर गाडी व चोरीस गेलेल्या गव्हाच्या बँगांबाबत चौकशी करून घटनास्थळाची फिर्यादी व टेम्पो मालकासह घटनेची पडताळणी केली. यावेळी फिर्यादीने संगितलेल्या हकिकतमध्ये विसंगती असल्याचे समोर आले. या संदर्भाने पथकाने घटनास्थळ व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी व तांत्रिक विश्वलेषण करून हा गुन्हा फिर्यादीनेच केला असावी असा संशय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कटके यांना व्यक्त केला. यानंतर फिर्यादी सुनील खिरडकरला ताब्यात घेऊन, चौकशीचे आदेश दिले अहेत.
चालकाडून टेम्पो चोरीची खोटी तक्रार
पथकाने फिर्यादीस ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपूस करता प्रथम त्याने चुकीची उत्तरे दिली. यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने सांगितले की, ही चोरी झाली नसून, 'मी आणि टेम्पो मालक बाबासाहेब बबन हिरे (रा. बहिरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी टेम्पोच्या फायनान्सची रक्कम टेम्पोच्या किंमतीपेक्षा जास्त झाली होती. तसेच ही रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून चोरीचा बनाव केला. टेम्पो मालक हिरे यांच्या सांगण्यावरुन आयशर टेम्पो गव्हासह कृष्णराज पेट्रोलियम पानपोई फाटा, वनद्रा, ता. कन्नड येथे लावून चोरीचा बनाव केला, असे त्यांने सांगितले.
Tags :
2387
10