माजी केंद्रिय राज्यमंञी बबनराव ढाकणेंनी प्रथमच घेतली मुलाची गळाभेट! अनेकांचे डोळे पाणावले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात आज "विधिमंडळातील बबनराव" या ग्रंथाचे प्रकाशन तसेच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांमध्ये बबनराव ढाकणे यांनी शरद पवार यांच्या राजकीय जीवनाचा थोडक्यात आढावा घेतला.
यानंतर आपणही सामाजिक राजकीय जीवनात काम करत असताना आपलेही कुटुंबाकडे कसे दुर्लक्ष झाले हे त्यांनी सांगितले. यावेळी प्रतापराव यांच्या बद्दल सांगताना बबनराव यांचा कंठ दाटून आला. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावरच आपल्या मुलाला आलिंगन देत असल्याचे सांगत मोठा गुलाब पुष्पांचा हार प्रतापराव यांना घातला. त्यानंतर दोघांनी गळा भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांचेही डोळे पाणावले.
सामाजिक आणि राजकीय जीवनामुळे आपले आपल्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
मी माझ्या मुलांनाही भेटू शकत नव्हतो. आज प्रताप हा राजकीय, सामाजिक जीवनात संघर्ष करत आहे. याचा मला अभिमान आहे, असे म्हणत, माजी केंद्रीय राज्यमंत्री व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी त्यांचे पुत्र प्रतापराव ढाकणे यांना व्यासपीठावरच आलिंगन दिले. तसेच गुलाब पुष्पांचा हार घालून त्यांचे कौतुकही केले.
एवढेच नाही, आपण पुत्राला दिलेले हे पहिलेच अलींगण असल्याचे म्हणताच, बबनराव आणि प्रतापराव यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले. शरद पवार यांच्यासमोरच हा प्रसंग घडला. यामुळे उपस्थितही काही वेळ स्तब्ध झाले होते.