महाराष्ट्र
माझा आवाज जनतेचा, सर्वसामान्य गोरगरिबांचा आहे- प्रा. किसन चव्हाण
By Admin
माझा आवाज जनतेचा, सर्वसामान्य गोरगरिबांचा आहे- प्रा. किसन चव्हाण
पाथर्डी -प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसमवेत नुकतीच घोंगडी बैठक घेण्यात आली.
प्रा. चव्हाण यांनी शेवगाव- पाथर्डी तालुक्यात गावोगाव जाऊन ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी घोंगडी बैठका सुरू केल्या आहे.
मौजे खेर्डे येथे कारभारी सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक संपन्न झाली. तोफा फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशाच्यां गजरात मिरवणूक काढून ,गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर झालेल्या घोंगडी बैठकीत प्रा. किसन चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य गोरगरिबांचे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्थापित कारखारदारांना वेळ नाही,त्यांना फक्त निवडणुकीच्या वेळेसच लोकांचा कळवळा येतो, पण तो कळवळा वांझोटा असतो , सर्वसामान्य माणूस नोकरशाहीला वैतागून गेला आहे ,कोणत्याही शासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आणि या नोकरशाही वर कोणत्याही प्रतिनिधी चा वचक नाही, त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. लोकांना वाऱ्यावर सोडून देऊन फक्त गावोगावच्या चेल्याचमच्या पुरतेच प्रतिनिधी राहिले आहे. त्यामूळे आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेऊन आणि ते सोडवण्यासाठी घोंगडी बैठका गावोगाव सुरू केल्या आहेत. त्यातुन लोकांचे प्रश्न ही सुटत आहेत. पण त्यामुळे प्रस्थापित कारखानदारांच्या बुडाला आग लागली असून ते अस्वस्थ आहेत. त्यामुळेच माझ्या भाषणाच्या वेळेस जाणीवपूर्वक कारखानदारांचे बागलबच्चे लाईट घालवत आहेत. पण त्यामुळे आमचा आवाज दबला जाणार नाही, जनतेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. माझा आवाज हा जनतेचा सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
या घोंगडी बैठकीस खेर्डे येथील विविध सहकारी सोसायटी सदस्य विष्णु बडे, उपसरपंच जेधे, राजेन्द्र ठोंबे,,आंबादास शेळके,जालिदंर सांगळे,सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच मारूती सांगळे,देविदास शेळके, सुखदेव सांगळे, प्रकाश ठोंबे,बाळासाहेब साठे, श्रीधर शेळके, अंबादास शेळके,कृष्णा सांगळे, विकास शेळके, राजेंद्र गिर्हे, विकास शेळके, मल्हारी टकले, गंगाधर सांगळे,कांता सागंळे,वसंत ठोंबे, अशोक ठोंबे, रघुनाथ बळवंत सांगळे, नितीन सरोदे,तान्हाजी सोळसे, विष्णु पालवे, आसाराम सांगळे,योसेफ ठोंबे,रावसाहेब साठे,प्रभाकर ठोंबे,तसेच महीला भगिणी सुनिता ठोंबे,आनिता कांबळे,संगीता साठे, सांगळे ताई व इतर महीला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या बैठकीत वंचित बहूजन आघाड़ीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, डॉ अंकुश गायकवाड, वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, वंचित बहूजन आघाड़ीचे युवा कार्यकर्ते अजय फुंदे, आसाराम सांगळे यांची भाषणे झाली.
यावेळी अरुण थोरात, सुनील जाधव,सोपान भिंगारे,बाळासाहेब फुंदे, बबनराव आढागळे,सुहास कांबळे व मौजे खेर्डे येथील स्वाभिमानी ग्रामस्थांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन वंचित बहूजन आघाड़ीचे पाथर्डी तालुका महासचिव संजय कांबळे यांनी केले तर सर्व उपस्थितीतांचे आभार रोहीणी ठोंबे यांनी मानले.
Tags :
79410
10