महाराष्ट्र
व्हिडिओ काॅल करून तरुणाची..."; तरूणीकडे धमकी देत अशी मागणी, आरोपी अटकेत
By Admin
व्हिडिओ काॅल करून तरुणाची..."; तरूणीकडे धमकी देत अशी मागणी, आरोपी अटकेत
शेवगाव तालुक्यातील 'या' गावातील तरुण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तरुणाने लग्नाची मागणी घातली. तरुणीने त्याला नकार दिला. व्हिडिओ काॅल करून तू तुझे शरीर दाखव, अशी मागणी तरुणीकडे केली. तसेच धमकीही दिली. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली.
चिंचवड येथे २०२० ते २२ जून २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
शुभम मनोहर पवार (वय २३, रा. लखमापुरी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने बुधवारी (दि. २२) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला लग्नाची मागणी घातली. मात्र फिर्यादी तरुणीने त्यास नकार दिला. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आई वडिलांना लग्नाबद्दल विचारून सांगते, असे तरुणीने सांगितले. त्यानंतर आरोपी शुभम याने पीडित तरुणीकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. व्हिडिओ काॅल करून तू कपडे काढून तुझे शरीर दाखव, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे फिर्यादी तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. फिर्यादी तरुणीने त्यास नकार दिला.

मी तुझ्या घरच्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करेल, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी वारंवार फोन करून दिली. तुझे दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर आहे. तू मला धोका दिला तर तुझी सगळी जिंदगी बरबाद करेन, अशीही धमकी दिली. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर रिक्षा घेऊन आला. फिर्यादीचा पाठलागही केला. फिर्यादीच्या आईच्या फोनवर फोन केला. भेटायला येते की नाही, अशी धमकी दिली.
Tags :
31369
10