महाराष्ट्र
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ परीक्षेच्या अंतिम निकाल जाहीर
By Admin
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ परीक्षेच्या अंतिम निकाल जाहीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ४ ऑक्टोबर, २०२१ ते २ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक १३ एप्रिल, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
त्यानुसार एकूण आठ संवर्गातील ११४५ पदांपैकी ११४३ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आली आहे. परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण ११४५ उमेदवारांपैकी अनाथांसाठी आरक्षित असलेल्या दोन पदांपैकी एक पद तसेच दिव्यांग श्रवण शक्तीतील दोष या प्रवर्गाकरीता आरक्षित असलेले एक पद पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त ठेवण्यात आले आहे.
या परीक्षेमध्ये स्वप्नील सुनिल पाटील हे राज्यातून सर्वसाधारण तसेच मागास प्रवर्गातून प्रथम आले आहेत व श्रीमती अनुजा प्रभाकर फडतरे या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यावेळी समान गुण धारण करणाऱ्या गुणवत्ताधारक उमेदवारांबाबत आयोगाच्या कार्यनियमावलीतील सुधारणेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली होती. तथापि, अन्य एका परीक्षेच्या न्यायिक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जाहीरातीच्या दिनांकास वैध असलेल्या तरतूदीनुसार कार्यवाही अनुसरणे क्रमप्राप्त ठरत असल्याने आयोगाच्या कार्यनियमावलीतील परिच्छेद १० (७) मधील तरतूदीनुसार समान गुण धारकांचा प्राधान्यक्रम व गुणवत्ता क्रम निश्चित करण्यात आला आहे.
या परीक्षेच्या निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
अंतिम निकालात अर्हताप्राप्त / शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे Online पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
अशी माहिती प्रसिध्दी पत्राद्वारे उपसचिव, परीक्षोत्तर राजपत्रित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी दिली आहे.
Tags :
260
10