पोलिसांचे छापे, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गोपेवाडी व तेलवाडी फाट्यावर अवैधरीत्या दारू वाहतूक व मटका घेणार्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण 54 हजार 75 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पथकाने शनिवारी (दि. आठ) पैठण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई केली. गोपेवाडी फाटा येथील एका हॉटेलमध्ये मटका घेताना मनोहर भागवत गव्हाणे यास रंगेहाथ पकडून एकूण 9 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यावेळी मिळालेल्या माहितीवरून शेवगाव पैठण रोडवरील तेलवाडी फाट्यावर पथकातील पोलिस नाईक सचिन भुमे, गणपत भवर, अरुण जाधव यांनी सापळा रचून सरदार इब-ाहिम शेख ( रा. सोनवाडी, ता. पैठण) याच्या ताब्यातून देशी दारूसह 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस नाईक वाल्मीक निकम व अरुण जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.