आरती केदार खेळणार टी-20 आयपीएल स्पर्धा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हञाळ येथील अष्टपैलू क्रिकेटपटू आरती केदार हिची महिला टी-20 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आयपीएलसाठी निवड झालेली ति जिल्ह्यातील पहिली महाला खेळाडू ठरली आहे.भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या वरिष्ठ महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत आरतीने सर्वाधिक 15 विकेट घेतल्या होत्या.तसेच यापुर्वी तिने महाराष्ट्र संघाकडून खेळतानाही चमकदार कामगिरी केलेली आहे.महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील संघात तिने अष्टपैलू कामगिरी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.2021 मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती.आता दि. 23 मे पासून सुरू होणाऱ्या महिला आयपीएल स्पर्धेत आरती खेळताना दिसणार आहे.जिल्ह्यातून आयपीएलसाठी निवड झालेली आरती हि पहीली महीला क्रिकेटर ठरली आहे.आरती ही प्रशिक्षक शशिकांत नि-हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
दहावीपर्यत शाळेत असताना मी शालेय स्पर्धेमध्ये खेळत होते.शालेय स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली.पुढे 19 वर्षाखालील गटातही महाराष्ट्र संघाकडून निवड झाली.2021-22 मध्ये बीसीसीआयच्या सिनिअर वनडे क्रिकेट स्पर्धैसाठी निवड झाली.त्यावेळी फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली.माञ नुकताच झालेल्या सिनिअर वूमन्स टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी माझी महाराष्ट्र संघाकडून पुन्हा निवड झाली.या स्पर्धेत मी सर्वाधिक बळी मिळवले.
आरती केदार
महिला क्रिकेटर