राजळे महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, 'आपल्या मनात स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी', या उद्देशाने व या देशाच्या दैदिप्यमान इतिहासाची अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी 'हरघर तिरंगा अभियान घरोघरी राबवावे व स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे' असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले होते. या अनुषंगाने महाविद्यालयात, स्वच्छता अभियान, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, महिला व किशोरी मेळावा, सहभोजन, वृक्षारोपण, पर्यावरण शपथ, इमारतीवर रोषणाई, देशभक्तीपर गीते इत्यादी उपक्रम घेण्यात आले. त्याचबरोबर कासार पिंपळगावत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभात फेरीमध्ये आ. मोनिकाताई राजळे, गावच्या सरपंच सौ.मोनालीताई राजळे, प्राचार्य डॉ.आर.जे. टेमकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज सूर्यवंशी, महाविद्यालयाचे अधीक्षक विक्रमराव राजळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. शाम गरड, प्रा.अशोक काळे, डॉ.बबनराव टिळेकर प्रा.राजेंद्र इंगळे, प्रा.अशोक ताठे, प्रा.असाराम देसाई, डॉ.राजकुमार घुले, प्रा.सुनंदा बडे ग्रामस्थ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.