राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उद्याचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम रद्द
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी (१० जुलै) अहमदनगर दौऱ्यावर येणार होते.
या दौऱ्यात दोन ते तीन तास ते नगरमध्ये थांबणार होते. तसेच दीड तास कार्यकर्त्यांची आढावा बैठकही घेणार होते. परंतु, काही कारणास्तव राजकीय दौरा रद्द झाल्याची
माहिती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दिली.राज्यस्तरावर झालेल्या या राजकीय उलथापालथीचा परिणाम स्थानिक पातळीवरही होत असतो. तसेच आगामी जिल्हा परिषदा व पंचायत
समित्यांच्या निवडणुका तोंडावर आहे. यापार्श्वभूमीवर पवार यांचा अहमदनगर दौरा चर्चेत होता.या दौऱ्यात अकरा ते एक वाजेपर्यंत सहकार सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा
घेणार होते. परंतु, हा दौराच रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. आषाढी एकादशीमुळे वाळूज-पंढरपूरला भाविकांची मोठी गर्दी होते. वाहतूक कोंडीही होऊ शकते. त्यामुळे पवार
बारामतीहून पुणे मार्गे थेट औरंगाबादला विमानाने जाण्याची शक्यता आहे. राजेंद्र फाळके म्हणाले, काही कारणास्तव पवार यांचा दौरा रद्द झाला. परंतु, ते औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत.
दोन वाजेपर्यंत अहमदनगरला थांबून ते औरंगाबादला रवाना होणार होते. आषाढी एकादशीमुळे वाळूज-पंढरपूरला भाविकांची मोठी गर्दी होऊ शकते. तसेच वाहतूक कोंडीही होऊ शकते.
यापार्श्वभुमीवर औरंगाबादला कारने ते जाणार नाहीत ते थेट विमानाने औरंगाबादेत येतील अशी शक्यता असल्याने त्यांचा अहमदनगर दौरा रद्द झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान दौरा अचानक रद्द झाल्याने
कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.त्यामुळे पवार बारामतीहून पुणे मार्गे थेट औरंगाबादला विमानाने जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, काही कारणास्तव
ज्येष्ठ नेते पवार यांचा रविवारी 10 जुलैचा दौरा रद्द झाला आहे. परंतु, ते पुढे औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्या दिवशीचे त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील नियोजित
कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे सांगितले