महाराष्ट्र
माणिकदौंडी परिसरातील लमाण तांड्यावर ॲड. प्रतापराव ढाकणेंची भेट
By Admin
माणिकदौंडी परिसरातील लमाण तांड्यावर ॲड. प्रतापराव ढाकणेंची भेट
पाथर्डी- प्रतिनिधी
होळी सणानिमित्त तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील लमाण तांडयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.प्रतापराव ढाकणे यांनी भेट देत बंजारा समाजातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बंजारा समाजातील महिलांनी पारंपारिक गीत गाऊन अॅड.ढाकणे यांचे स्वागत केले.
होळी सण संपूर्ण देशभरात विविध रंगांची छटा घेऊन साजरा करण्यात येतो.काहीशा अशाच पद्धतीने तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील लमाण तांड्यांवर होळी सणाचा विशेष उत्साह पहावयास मिळत असतो.कोविड महामारीच्या दोन वर्षांच्या वाईट अनुभवानंतर यंदा या परिसरात बंजारा समाजातील
बाहेरगावी कामानिनित्त असणाऱ्या महिला व पुरुष प्रथमच एकत्र आले.दोन वर्षांच्या कालखंडानंतर आप्तेष्ट समवेत पारंपारिक व रूढीनुसार होळी सण साजरा करण्याचा क्षण प्रत्येकाने मनमुराद घेतला.
बंजारा समाजाच्या आग्रहानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.प्रतापराव ढाकणे यांनी दि.२१ मार्च रोजी सकाळीच तालुक्यातील हरीचा तांडा,पत्र्याचा तांडा,आल्हणवाडी या गावांना भेटी देत सदरील गावांतील ग्रामस्थांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी बंजारा समाजाकडून अॅड.ढाकणे यांचे प्रत्येक गावात उत्फूर्त स्वागत करण्यात आले. सोबत बंजारा समाजातील महिलांनी प्रत्येक गावात पारंपारिक वेशभूषा परिधान करत व लमाण समाजातील प्रथेच्या अनुसार होळी व सणाच्या अनुसार गीत गात स्वागत केले.
यावेळी बोलताना ॲड. ढाकणे म्हणाले,माणिकदौंडी व तालुक्यातील इतर डोंगराळ भागासाठी माजी केंद्रीय मंत्री श्री.बबनराव ढाकणे साहेब यांनी मोठा संघर्ष करून उपेक्षित,वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.ज्या समाजाला व त्यांच्या लोकवस्तीला शासन बेदखल करत होते.त्यांच्या उत्कर्षासाठी जुन्या काळात श्री.ढाकणे साहेब यांनी केलेल्या कार्यामुळे आजची ओळख निर्माण झाली.पटेलवाडा तलाव,बोरसेवाडी डोंगरवरील पाण्याची टाकी तसेच डमाळवाडी जाटदेवळे,आल्हणवाडी परिसरात केलेली रस्ते,वीज,पाण्याची व्यवस्था यामुळे हा परिसर प्रवाहाच्या मुख्य झोकात येऊ शकला.आजचा बारामती-औरंगाबाद रस्ता हा ढाकणे साहेबांनी बांधकाम मंत्री असतांना केलेला प्रस्तावित असून त्यामुळे दळणवळणाची सहजता निर्माण होऊ शकली.
ढाकणे कुटुंब नेहमी या तालुक्याचा व इथल्या प्रत्येक गावांचा विचार करून हिताचा निर्णय घेत असते.तुमची व आमची नाळ एकच असून हीच विचारधारा जोपासण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
त्याप्रसंगी माजी जी. प.सदस्य गहिनीनाथ शिरसाट,पिंपळगाव टप्पाचे पांडुरंग शिरसाट, अर्जुन चितळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश रासने,सेवानिवृत्त तहसिलदार राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते.
Tags :
27420
10