महाराष्ट्र
कृतज्ञताभाव आपल्याला मोठा करत असतो. हर्षदाताई काकडे
By Admin
कृतज्ञताभाव आपल्याला मोठा करत असतो.- हर्षदाताई काकडे
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहरटाकळी, ता. शेवगाव जि. अ.नगर येथे 33 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेल्या प्राचार्य बाळासाहेब बाबुराव भगत यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
प्रथमत: विद्येची देवता सरस्वती, कर्मयोगी आबासाहेब काकडे व स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.
बाळासाहेब भगत यांचा सपत्नीक सत्कार कर्मयोगी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या वतीने व शहरटाकळी विद्यालयाच्या वतीने पुर्ण पोषाख, बुके, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ हर्षदाताई काकडे, जि. प. सदस्य अहमदनगर यांनी आपल्या भाषणात कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहामध्ये तालुक्या व जिल्ह्याबाहेरील एक एक हिरे सेवेत आहेत यांनी संस्थेचे नाव उज्वल केले संस्थेविषयी कृतज्ञता ठेवलेल्या पैकी बाळासाहेब भगत हे एक भगत यांनी संस्थेच्या नावलौकिकात भर घातली 33 वर्ष शेवगाव तालुक्यामध्ये नोकरी करत असताना आपल्या गावाची आठवण ठेवून गावा बाबतही ऋणानुबंध जपले
एखाद्या व्यक्तीने आपले कर्तुत्व बजावत असताना मागे वळून पाहिले पाहिजे अशा वेळेस आपल्या गावाची व त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढत असते
संस्थेमध्ये काम करत असताना गावातील मित्र, कुटुंब याविषयी कृतज्ञता ठेवली. आई, वडील, भाऊ यांचे संस्कार बाळासाहेब भगत यांना मिळाले. जो माणूस पुढे चालताना मागचे विसरत नाही तो जीवनामध्ये यशस्वी होतो.
आज बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आलेला जनसमुदाय यातून त्यांचे कार्य दिसते. तसेच बाळासाहेब भगत यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब भगत यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांचे प्राथमिक, महाविद्यालय शिक्षण त्यानंतर नोकरीतील संपूर्ण प्रवास त्याचे वर्णन सर्वांसमोर विशद करताना कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहात सेवा करण्याची मला मिळालेली संधी व शैक्षणिक कार्याचा वसा वेगवेगळ्या विद्यालयातून जपण्याचा प्रयत्न, तसेच ज्ञानदानाचा वसा जोपासून संस्थेने दाखवलेला माझ्यावरील विश्वास त्या विश्वासाची पात्र ठरलो. संस्था सुख-दुःखात माझ्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मी घडलो.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. विद्याधरजी काकडे, सौ. हर्षदाताई काकडे यांच्या ऋणात मी कायम राहू इच्छितो तसेच यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मित्र परिवार, नातेवाईक, आई-वडील भाऊ, पत्नी यांच्या विषयी ऋण व्यक्त केले व सेवापूर्ती गौरव समारंभा बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणजी बिटाळ, प्रा.गणपती पोळ, उत्तम कांडेकर, प्राचार्य संजय चेमटे, नितीन भगत, सुपेकर सर, विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, पर्यवेक्षिका अंजली चिंतामण यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आदित्य जगदाळे, दूर्वा काकडे, दिशा कापरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी विद्याताई लोढे, सरपंच मजलेशहर, शिवाजीराव शिंदे, सरपंच पानोली, प्रशांत भगत उपसरपंच पानोली, किसन राजेभगत, पांडुरंग कुलट, शरदराव गाडेकर, संभाजी भगत, सचिन भगत, अंकुशराव झंजाळ, प्राचार्य संपतराव दसपुते, संस्था प्रतिनिधी अनिल मगर, विविध विद्यालयाचे आजी-माजी व शिक्षक, मित्रपरिवार व आप्तेष्ट, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहदेव साळवे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका भिसे व ज्ञानेश्वर भोसले यांनी केले. आभार संजय मरकड यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू- भगिनींनी परिश्रम घेतले.
यावेळी जि. प.सदस्या, अ.नगर,सौ हर्षदाताई काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणजी बिटाळ,सरपंच मजलेशहर, विद्याताई लोढे व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यालयातील मुलींसाठी नवीन स्वच्छतागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
Tags :
36924
10