पाथर्डी पोलिसांचा दारूअड्ड्यावर छापा; अवैध दारूअड्डे पोलिसांच्या रडारवर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील कोरडगाव रोडवरील हरिजन वस्ती येथे विनापरवाना बेकायदेशीर गावठी दारू तयार करणार्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी कैलास भाऊ काळोखे (वय 41 रा.हरीजन वस्ती कोरडगाव रोड पाथर्डी) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शहरातील कोरडगाव रोडवर हरिजन वस्ती येथे कैलास काळोखे नावाचा ईसम हातभट्टीची दारू तयार करत आहे.
त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील,पोलिस कॉन्स्टेबल संदीप बडे, कुमार कराड, भाऊसाहेब खेडकर,संदीप कानडे, नारायण कुटे यांनी हा छापा टाकून हातभट्टी बनवण्याचे लागणारे साहित्य जप्त करुन रसायन जागीच नष्ट करण्यात आले. पाथडी शहरातील कोरडगावरोड येथील हरीजन वस्ती येथे कैलास काळोखे हा त्याचे राहते घरासमोरील जागेत विनापरवाना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करत आहे.
त्याठिकाणी पोलिस पथकातील काही सहकार्यांनी पायी चालत जावुन धाड टाकली. त्यावेळी काळोखे हा घरासमोरील मोकळ्या जागेत एका लोखंडी टिपाडाला खालुन जाळ लावून त्यातील मिश्रणास हातातील काठीने ढवळत होता. त्याचवेळी कैलास काळोखे याला जागीच ताब्यात घेतले. या कारवाईत 4800 रुपये किंमतीचे गावठी हातभट्टीचे दारू तयार करीता लोखडी टिपाडीमध्ये भरलेले कच्चे रसायन अंदाजे 800 लिटर, गावठी हातभट्टीची 1000 रूपयांची तयार दारू व इतर साहित्यासह काळागुळ, रसायन असा मुद्देमाल मिळाला आहे.
यातील सर्व मुद्देमाल हा जागीच पोलिसांनी नष्ट केला आहे. विरुध्द महाराष्ट्र दारबंदी कायदा कलम प्रमाण पाथर्डी पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल संदीप विनायक बडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी शहरातील आणि अन्य भागातील दारूचे अड्डे पोलिसांचा रडारवरती आले आहे.