महाराष्ट्र
संजय गांधी निराधार योजना समितीची निर्मिती वंचिताच्या हितासाठी- ॲड. प्रताप ढाकणे
By Admin
संजय गांधी निराधार योजना समितीची निर्मिती वंचिताच्या हितासाठी- ॲड. प्रताप ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री बॅरीस्टर ए.आर.अंतुले यांनी संजय गांधी निराधार योजना समितीची निर्मिती वंचितांच्या हितासाठी व्यापक दृष्टीकोनातून केली.त्याच विचारधारेवर तालुक्याची समिती कामकाज करेल.मात्र यामागच्या काळातील समितीच्या भानगडी शोधून काढत भ्रष्टांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड.प्रतापराव ढाकणे यांनी दिला.
तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वैभव दहिफळे व इतर सदस्यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम तहसिल कार्यालयातील सभागृहात बुधवारी दुपारी संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भगवान दराडे,तहसिलदार शाम वाडकर,राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा सविता भापकर,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख मंगलताई म्हस्के, शहराध्यक्ष योगेश रासने,किशोर डांगे,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष महारुद्र कीर्तने,माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,माजी सरपंच अनिल ढाकणे,मोहरीचे सरपंच कल्पजित डोईफोडे,चंद्रकांत दहिफळे,डॉ.राजेंद्र खेडकर,माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर केळगंद्रे,आदी उपस्थित होते.
अॅड.ढाकणे पुढे म्हणाले,कल्याणकारी राज्याची संकल्पना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार करीत आहे.त्याच धोरणानुसार आपण तालुक्यातील सर्व शासकीय समित्यांवर तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना संधी दिली.या तत्वाची दखल तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा घेतली.
संजय गांधी निराधार समिती उपेक्षित,वंचिताना आधार व न्याय देण्यासाठी आहे.यामाध्यमातून गरजूंना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.तालुक्याच्या इतिहासात झाला नसेल असे आदर्श कामकाजात भविष्यात करून दाखवू ,मात्र यामागच्या कारभाराचीही चौकशी करण्याला भाग पाडणार आहोत.यासामितीच्या मागच्या कार्यकाळाबाबत अनेक गंभीर तक्रारी जनतेच्या असल्याने हे सर्व गैरप्रकार शोधून काढूच.तसेच समितीचा कारभार पारदर्शीपणे होण्यासाठी गणनिहाय मेळावे घेऊन गावागावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार असून, यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल व कामकाज लोकाभिमुख होण्यास मदत होईल.
यावेळी वैभव दहिफळे,शिवशंकर राजळे,दराडे,शेख व तहसिलदार वाडकर यांचेही मनोगत झाले.
बाळासाहेब घुले यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले
Tags :
15163
10