महाराष्ट्र
पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपरी,सुसरे,सैदापूर,निवंडुगे एक्सप्रेसवे मुळे बदलणार शेतकऱ्यांचे नशीब !
By Admin
पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपरी,सुसरे,सैदापूर,निवंडुगे एक्सप्रेसवे मुळे बदलणार शेतकऱ्यांचे नशीब !
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपरी,सुसरे,सैदापूर,हञाळ,साकेगाव,पाडळी निवंडुगे,देवराई,शिरापूर या गावातून जाणारा
पुणे -नगर -औरंगाबाद असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार आहे.
या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.काही शेतकरी जमीनीचा मोबादला लाखाच्या घरात जाणार असून लोकांना जमीनीचे पैसे मिळतील अशी आशा आहे.
२६० किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार आहे. यात नगर जिल्ह्यात १२३ किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे राहणार आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे, नगर, पाथर्डी या तीन तालुक्यांचा समावेश राहील.
नगर -औरंगाबाद या सध्याच्या रस्त्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरुन हा नवा एक्सप्रेस वे जाणार आहे.
हा नवा एक्सप्रेसवे नगर जिल्ह्यातील नगर, नेवासे व पाथर्डी या तालुक्यांतून १२३ किलोमीटर जाणार आहे. "एक्सप्रेस'वे च्या भूसंपादनासाठी नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस महामार्गावर 140 किमी वेगाने प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते अमेरिकेच्या स्टँडर्डसारखे असतील असं आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथून या एक्सप्रेसवेला सुरुवात होणार आहे. या एक्सप्रेसवेसाठी पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. लोकप्रतिनिधींची बैठक देखील झाली आहे. जिल्ह्यातील एक्सप्रेसवेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, औरंगाबाद- पुणे या नवीन एक्सप्रेसवेसाठी
लोकप्रतिनिधींची बैठक बोलावू, असेही नुकताच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
जुन्या पुणे -औरंगाबाद रोडवरील वाहतूक होणार कमी
पुणे -औरंगाबाद हा सध्याचा रस्ता सध्या बांधकाम विभागाच्या अखेरित्या येतो. या रस्त्यावरून पुणे व औरंगाबादकडे जाणारी व येणारी वाहतूक नगर शहरामार्गे जाते. नव्या एक्सप्रेसवेमुळे ही वाहतूक शहरातून जाण्याऐवजी नगर शहराबाहेरून होत असलेल्या नव्या एक्सप्रेसवे ने जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
डीपीआर'ची घोषणा सहा वर्षांपूर्वीची आहे.
पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याचा 'डीपीआर' तयार करण्याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) मार्च २०१६ मध्ये दिले होते. 'डीपीआर' करताना 'औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन' विभागाचा सल्ला घेण्याची सूचना त्यावेळी करण्यात आली होती
सोलापूर-नगर महामार्गास जोडला जाईल नवा रस्ता
पुणे एक्स्प्रेस वे सोलापूर-नगरच्या मध्ये मिळेल. तेथून सुरतच्या दिशेने गेल्यास मुंबई-दिल्ली हायवेलाही जाता येईल. 'समृद्धी'शी जोडले तर नागपूरलाही जाता येईल. एकूणच या नव्या महामार्गामुळे औरंगाबादहून बंगळुरू, दिल्ली, नागपूर असा एकत्र हायवेचा पर्याय निर्माण होईल.
या भागातून जाणार रस्ता
औरंगाबाद ते पैठण ५५ किमी, आष्टीजवळ ६.५ किमी, नगरमध्ये श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डीतून १२६ किमी, पुणे जिल्ह्यात भोर, पुरंदर, शिरूर, दौंड असा ८०.५ किमी असा २६८ किमीचा पुणे महामार्ग असेल. औरंगाबादेतील रांजणगावात १२ किमी, बिडकीनमध्ये आठ किमी मार्ग 'समृद्धी'ला जोडला जाईल.
अहमदनगर जिल्हा :-
श्रीगोंदा तालुका :- हिंगणी, देवदैठण (ढवळे वस्ती)
पारनेर तालुका :- पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डे, बाबुर्डी, रुई छत्रपती, पिपरी गवळी, रायतळे, अस्तगांव, सारोळा कासार
नगर तालुका :- बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातोडी पारगाव, मराठवाडी, दगडवाडी
पाथर्डी तालुका :- देवराई, शिरापूर, तिसगाव, निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसरे
शेवगाव :- मुर्शदपूर, हासनापूर, वारखेड, चापडगाव, प्रभू वडगाव,
औरंगाबाद जिल्हा :-
पैठण तालुका :- खडके, मडके, साईगाव, दादेगाव जहागीर, पानठेवाडी, कांजरखेडा, वरुडी बुद्रुक, वावा, वडाळा, डोणगाव (पैठण), पोरगाव तांडा, वरवंडी खुर्द, घरडोण, आडगाव, झाल्टा, सुंदरवाडी, रामपूर, मल्हारपूर
पुरंदर तालुका :- खेड - शिवापूर येथून स्टार्ट होऊन - शिवरे, गराडे, चांभळी, पवारवाडी, सासवड
हवेली तालुका :- वळती, उरळी कांचन, कोरेगाव मूळ
शिरूर :- हिंगणवाडी, देवकरवाडी, पानवली, आंबळे, कर्डे, गोलेगाव,
औरंगाबाद ते पुणे 6 तासांचे अंतर
सध्या औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो. केंद्र सरकारने देशभरात द्रुतगती मार्ग तयार करण्याचे नियोजन केले असून त्यातील टप्पा क्रमांक 2 मध्ये पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा समावेश आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्या अस्तित्वात असलेला मार्ग वगळून नव्याने ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे केला जाणार आहे.अशी माहीती प्रकल्प संचालक यांनी माहीती दिली आहे.
Tags :
1038157
10