महाराष्ट्र
पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख पेक्षा जास्त शेतकरी पात्र
By Admin
पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख पेक्षा जास्त शेतकरी पात्र
तालुकानिहाय पाञ शेतकरी यादी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांची दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफी करण्यात आली होती.
तसेच कर्जमाफी योजनेत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50 हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते.
परंतु मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे सगळे व्यवहार ठप्प झाल्याने या योजनेला खीळ बसली होती. परंतु काही महिने अगोदर राज्यात सत्ताबदल होऊन सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात केली.
तसेच यासाठीची पहिली पात्र शेतकऱ्यांची यादी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे व ही यादी प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जाणार आहे.
प्रोत्साहन अनुदानामध्ये राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख तीन हजार 569 शेतकरी बांधव नियमित पीक कर्जाची परतफेड करत असून ते या योजनेसाठी पात्र झाले आहेत.
अहमदनगरजिल्ह्यातदोनलाखापेक्षाजास्तशेतकरी 50 हजाररुपयेप्रोत्साहनअनुदानासपात्र
अहमदनगर जिल्ह्यातील 2 लाख तीन हजार 569 शेतकरी या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असून या पैकी 36 हजार 164 शेतकऱ्यांची पहिली यादी सार्वजनिक देखील करण्यात आली आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नावे यादी मध्ये आहेत अशा शेतकरी बांधवांनी लवकर आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करायचे असेल असे शेतकरी बांधवांनी आधार कार्ड आणि यादीमध्ये दिलेला विशिष्ट क्रमांक त्यासाठी लागणारा असून आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळणार नसल्याचे अधिकार्यांनी नमूद केले आहे.
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर वर म्हणजेच आपले सेवा केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शेचाळीस हजार 922 शेतकरी यासाठी पात्र असून त्यातील पहिल्या यादीत 8705 शेतकऱ्यांची नावे आली आहेत.म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुका हा नंबर एक वर आहे.
अहमदनगरजिल्ह्यातीलतालुकानिहायपात्रशेतकऱ्यांचेसंख्या
1- जामखेड- एकूण लाभार्थी नऊ हजार 470 शेतकरी, पहिल्या टप्प्यात 2888 लाभार्थी
2- अहमदनगर- एकूण लाभार्थी 28 हजार 410 शेतकरी, पहिल्या टप्प्यातील यादीत 5196 शेतकरी
3- पाथर्डी- एकूण लाभार्थी 26 हजार 128 शेतकरी, पहिल्या टप्प्यातील यादीत तीन हजार 852 लाभार्थी शेतकरी
4- कर्जत- एकूण लाभार्थी 14 हजार 348 शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 3548 शेतकरी
5- नेवासा- एकूण सात हजार एकवीस लाभार्थी शेतकरी, पहिल्या टप्प्यातील 606 लाभार्थी
6- श्रीगोंदा- एकूण लाभार्थी 8569 शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 824 शेतकरी
- राहता- एकूण लाभार्थी 6212 शेतकरी, पहिल्या टप्प्यात एक हजार 119 लाभार्थी शेतकरी
8- राहुरी- एकूण तीन हजार 758 लाभार्थी शेतकरी, पहिल्या टप्प्यात 478 लाभार्थी शेतकरी
9- शेवगाव-एकूण 7120 लाभार्थी शेतकरी, पहिल्या टप्प्यात 761 लाभार्थी
10- कोपरगाव- एकूण सात हजार 457 लाभार्थी शेतकरी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थी 1325 शेतकरी
Tags :
312
10