कवडदरा विद्यालयात बाल दिन व पंडीत जवाहरलाल नेहरु जन्म दिन साजरा
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज मध्ये
बाल दिन व पंडीत जवाहरलाल नेहरु जन्म दिन साजरा करण्यात आला .यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य व्ही.एम. कांबळे ,माजी सरपंच दत्तूपाटील जुंदरे यांनी केले.
यावेळी बालदिनानिम्मित लहानमुलांमधील निरागस पण जपण्यासाठी
कबड्डी स्पर्धा , मामाचे पञ , तळ्यात मळ्यात, लंगडी खेळ, गोल सर्कल , पारंपरिक खेळ स्पर्धा घेण्यात आल्या.
यामध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होवून खेळाचा आनंद लुटला.
यावेळी कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.